प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
आज दि 26 जानेवारी रोजी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी तालुका फलटण ता. जि सातारा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. कुंदन साहेबराव चव्हाण साहेब, सांगवी गावचे प्रतिष्ठित तसेच मानवाधिकारचे पदाधिकारी ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या स्वागतानंतर संस्थेचे सचिव माननीय श्री कुंदन साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांनी कवायत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात केलेआले.जिल्हास्तरीय आश्रमशाळाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीताने. करण्यात आला..या कार्यक्रमासाठी प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment