मलठण मध्ये काय सुधारणा झाली म्हणनाऱ्यानी फलटण मध्ये काय सुधारणा केली हे ही सांगावे: - नगरसेवक अशोकराव जाधव.

मलठण मध्ये काय सुधारणा झाली म्हणनाऱ्यानी फलटण मध्ये काय सुधारणा केली हे ही सांगावे: - नगरसेवक अशोकराव जाधव.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

मलठण - गेली 30 ते 35 वर्षे एक हाती सत्ता असताना आपण राजकारणा शिवाय काहीही केलेले नाही.जाती पातीचे राजकारण करून माणसांना माणसात ठेवले नाही विकास कामांचे नावाने बोंबाबोंब झाली आहे आज फलटण शहरात पाण्याची समस्या, आरोग्याची समस्या, रस्त्यांची दुरावस्था, लाईट,कचरा विस्थपण या तील कोणतीही समस्या सत्ताधारी मंडळींना सोडवता आलेली नाही याच कालावधी मध्ये आपले मागून बारामती ची झालेली सुधारणा बघता आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करावे लोकनेते माजी खासदार यांचे 18 महिन्याचे कारकीर्दीत मलठण चे डांबरीकरण तसेच मुस्लिम समाजाचे दफन भुमिस कंपाऊंड, व्हि सेप गटारे अशी अनेक कामे केली त्या नंतर गेली 3 वर्षाचे कारकीर्दीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्षनेते श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मलठण मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, लोहार समाज मंदिर, वारकरी भवण, पिण्याचे पाण्याच्या 10 लाख लिटरच्या दोन टाक्या, अंगणवाडी, शहर नागरी सुविधा मधुन सरकारी आपला दवाखाना या कामांची सुरुवात झालेली आहे व प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल शेजारी स्टेडियम, जिमण्याशियम हॉल, स्विमिंग पुल अश्या 20 ते 25 कोटी रुपयांचे विकास कामांची वर्क ऑर्डर सुधा झालेली आहेत व फलटण शहरात जवळ जवळ 150 कोटी रुपयांची कामे मंजुर केलेली आहेत 
या उलट आपण तिन्ही भावानी मिळून व स्वीकृत नगरसेवक पांडू गुंजवटे ला हाताशी धरून मलठण मधील मंजुर असलेली विकास कामे हाणून पाडण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे.मलठण ला सतत कमी लेखनाऱ्या राजे फॅमिली ला व त्यांचे राजकीय कार्यकर्त्यांना मलठण मध्ये मते मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही त्या मुळे यापुढे श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे आपण व आपले बगलबच्यानी मलठण मध्ये मते न मागितलेलीच बरी नाहीतर मलठण मधील ही जनता आता माफ करनार नाही.मलठण मधील जनतेस मी आव्हान करीत आहे की मलठण चे विकासास आड येणाऱ्या व सतत मलठण ला कमी लेखनाऱ्या या मंडळींना दारात उभे करू नये व येणाऱ्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवल्या शिवाय राहू नये.असे मत स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.