ॲड.फरहीन खान पटेल यांना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुल्ला.
ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहेत सन 2012 पासून वकील क्षेत्रात कार्यरत आहे तसेच कायदेशीर शिबीर मार्फत तसेच सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम,अंगणवाडी,शाळा, महाविद्यालय,बचत गटातील महिलांचे कार्यक्रम,महिलांचे संबंधित इतर कार्यक्रम अश्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क जबाबदारी तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण,सबलीकरण सशक्तिकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वलिखित काव्यरचनांच्या द्वारे आपले विचार मांडत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार व अव्यक्त अबोली साहित्य मंच तर्फे वनश्री पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाबकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार तसेच लेखणी रत्न साहित्य ई पुरस्कार काव्य लेखन ई पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त, राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक २४/११/२०२४ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत गारगोटे
संस्थापक अध्यक्ष- प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे.
अध्यक्ष- पिंकीताई सागर वाघमारे.पुणे जिल्हा अध्यक्ष -रितेश वाघमारे.उद्घाटक- अमर चौरे.प्रमुख मार्गदर्शक -हरेशभाई देखने.कार्यक्रम ,प्रमुख साहित्यिक -देवीलाल रौराळे.प्रमुख आकर्षण क्रांतीनाना मळेगावकर(फेम-न्यू होम मिनिस्टर)आरोही हिवरकर (अभिनेत्री) काव्या मुंबईकर(युवा लावण्यवती) रेखा गायकवाड (अभिनेत्री मोहिनी कदम (रिल्ल स्टार)मोनिका कंठाळे(रिल्ल स्टार)
सूत्रसंचालन :सोनाली सुतार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ यांच्यातर्फे अँड. फरहीन खान-पटेल याना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment