दिप्ती जाधवचे सेट परीक्षेत यश.

दिप्ती जाधवचे सेट परीक्षेत यश.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

 पुसेगाव (ता.खटाव) येथील वाय. सी. कॉलेजची विद्यार्थीनी आणि पुसेगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिलीपराव जाधव यांची सुकन्या दिप्ती जाधव हिने सेट परीक्षेत यश मिळविले. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातून दिप्ती सध्या पीएच.डी. करीत आहे. एप्रिल 2024 मध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा घेण्यात आली होती. याकरीता तब्बल एक लाख 9250 विद्यार्थी बसलेले होते. यामधून फक्त 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च महाविद्यालयीन विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र सेटची परीक्षा देत असतात. ही परीक्षा स्पर्धात्मक स्वरुपाची असल्याने त्यामध्ये यश मिळविणे कठीण असते. दिप्तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुसेगावमध्ये झाले असून सातारा येथील वाय. सी.कॉलेजमधून ती एम. एस्सी. फस्ट क्लास उत्तीर्ण झाली आहे. शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थीने हे यश मिळविल्याबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.