माजी खासदार कै. बाळासाहेब देशमुख यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक वेगळी ओळख - रविराज देसाई दादा.

माजी खासदार कै. बाळासाहेब देशमुख यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक वेगळी ओळख - रविराज देसाई  दादा.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

जीवनामध्ये कष्ट, खडतर परिश्रम, गोर गरीबांचे विषयी आस्था असणारे, सर्व सामान्य जनतेत एक सामजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे स्व.शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख हे होय,असे मत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी व्यक्त केले, ते आज स्व.शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये  ते बोलत होते, या कार्यक्रमादरम्यान सर्व प्रथम स्व.शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या  कु.आर्यन पानस्कर, कु.स्नेहल पाटील, कु. वैष्णवी कुंभार या विद्यार्थ्याचा व पालकांचा  प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर यांनी आपल्या मनोगतातून आदरणीय विजयादेवी देसाई  माँसाहेब यांनी  गेली 14  वर्षे   राबविलेल्या आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या उपक्रमाविषयी माँसाहेब यांचे कौतुक केले, या कार्यक्रमादरम्यान एन.एम.एम.एस. परीक्षा  मार्गदर्शक कु.मणेर एस.एस.मॅडम, श्री.डोंगरे एस.एल.सर,व श्री.कदम आर.एन.सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष कदम सर यांनी केले तर आभार श्री संजय डोंगरे सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व  सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.