चंद्रकांत तांदूळवाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
बुध येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी चंद्रकांत परशराम तांदुळवाडकर ( वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनामुळे बुध परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. जुण्या पिढीतील प्रसिद्ध किराणा व्यापारी परशराम तांदुळवाडकर यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर राजेश तांदुळवाडकर यांचे ते वडील होत.
Comments
Post a Comment