अटल भूजल योजनेअंतर्गत येणाऱ्या निढळ येथे केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
निढळ .ता .खटाव येथे अटल भूजल योजने अंतर्गत गावांमध्ये डॉ राघव लांगर (IAS) साहेब (डायरेक्ट अँड ओ एस डी सेक्रेटरी) अटल जल, नवी दिल्ली व मा.श्री.डॉ. उमेश बालपांडे साहेब (डायरेक्टर राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष) अटल जल, नवी दिल्ली तसेच मा..पी.सी कुमावत साहेब (कृषी तज्ञ) राष्ट्रीय व्यवस्थापन कक्ष अटल जल नवी दिल्ली, यांनी गावांमध्ये क्षेत्रीय भेट दिली.भेटीदरम्यान गावकऱ्यांकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हनुमान विद्यालय निढळ शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. गावातील महिलांकडून मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. फळबाग लागवड करणारे शेतकरी, ठिबक सिंचन करणारे शेतकरी, व सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पवार श्री. दिलीप तोरस्कर श्री. यशवंत जाधव यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर डॉ. राघव लांगर (IAS) साहेब यांनी गावातील लोकांबरोबर संवाद साधला. पाणी बचतीच्या उपाययोजना व उपलब्ध पाण्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अटल भूजल योजनेअंतर्गत गावामध्ये झालेल्या विविध कामांची माहिती उपसरपंच नवनाथ खुस्पे, श्रीकांत खुस्पे, विजय शिंदे, यांनी दिली. गावामध्ये झालेल्या रिचार्ज चा फायदा याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच गावातील पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य व शेतकऱ्यांबरोबर व भुजल मित्र तसेच भूजल सखी यांचा बरोबर चर्चा केली.त्यानंतर भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गावकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर रिचार्ज शाफ्ट व पाझर तलाव यांची पाहणी केली.यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे विभागाचे आयुक्त मा. श्री. डॉ. विजय पाखमोडे साहेब, मा. श्री डॉ. प्रवीण कथने साहेब सहसंचालक, मा. श्री. ऋषीराज गोस्की साहेब वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा नोडल अधिकारी अटल जल SPMU पुणे, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या IEC तज्ञ श्रीम. दिपाली पाटील व क्षमता बांधणी तज्ञ मा. श्री. विनायक गार्डे व वरीष्ठ भू वैज्ञानिक मा. श्री. प्रकाश बेडसे साहेब, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ, कृषी तज्ञ जलसंधारण तज्ञ यावेळी गावातील सरपंच सौ. रेखा घाडगे, सौ. बायडाबाई ठोंबरे सौ. राजश्री शिंगाडे श्री. कैलास भोसले, ग्रामसेवक श्री शशिकांत कचरे गावकामगार तलाठी श्री. अमित हिरके, महिला वर्ग, भुजल मित्र श्री. अजित वसव, श्री. अशोक खुस्पे, श्री. दिपक मोहिते, श्री. संतोष शिंदे, श्री. सिद्धम भिसे, स्वयंसेवक, जलसुरक्षक, अशा अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment