खून करून दिल्ली हरियाणा या राज्यामध्ये फरार झालेला आरोपीला पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश.

खून करून दिल्ली हरियाणा या राज्यामध्ये फरार झालेला  आरोपीला पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

 पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरूज या गावी पत्नी व मुलाला पाठवत नसल्याच्या कारणावरून नाथजावयाने चिडून जाऊन सासरच्या घरातील लोकांची भांडण करून आजेसासूला शालन शंकर आवळे ,राहणार दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा हिच्याकडे रागातून बघून जे होतं ते ह्या म्हातारी मुळेच होते तिला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत नातजावायाने त्याच्या ताब्यातील इंडिका कंपनीची गाडी चालू करून गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा जोराने पुढे नेऊन आज्जी सासूच्या अंगावर चार चाकी गाडी घालून आजी सासूला गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना घडली होती. त्यातील पुसेगाव पोलीस ठाणे दिनांक 13 .5 .2024 रोजी खुनाच्या बाबद गुन्हा दाखल झालेला होता. घटना घडल्यानंतर सदर गुन्हातील आरोपी हा फरार झालेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी गुन्हा दाखल होताच घडलेल्या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक श्री समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव .श्रीमती सोनाली कदम यांना माहिती दिली. वरिष्ठांनी दिलेल्या  मार्गदर्शन व सूचनानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी सागर उमापे हा कुटुंबासह दिल्ली, हरियाणा या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या तपासाकरिता एक पथक दिल्ली येथे रवाना केले होते मात्र  पोलिसांची चाहूल लागता क्षणी आरोपी दिल्ली येथून नाशिक मार्गे सांगली कडे जात असल्याचे तांत्रिक माहितीनुसार पुढे येत होते. त्यानुसार दुसऱ्या तपासा पथकाने पुणे, सातारा ,कराड मार्गावर सापळा रचून आरोपी सागर संपत उमापे वय 24 वर्ष मूळ राहणार ,राजाचे कुर्ले , तालुका खटाव ,जिल्हा सातारा .सध्या राहणार गंगापूर, शिवनगर आनंद कॉलनी नाशिक, तालुका जिल्हा नाशिक यास कराड येथील एसटी स्टँड येथून ताब्यात घेऊन सदर गुण्याचे कामे दिनांक 18. 5. 2024 रोजी अटक करण्यात आली आहे आज रोजी त्यास वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत. तर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,श्रीमती आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  श्रीमती सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी आशिष कांबळे, सह फौजदार सुधाकर भोसले ,पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनील अब्दागिरी ,अशोक सरक, प्रमोद कदम ,तुषार बाबर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगदाळे ,अविनाश घाडगे, अमृता चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत केली आहे त्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी अभिनंदन केलेले आहे .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.