अर्णव चव्हाणची सैनिक स्कूलसाठी निवड.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
नेर ता. खटाव येथील चि.अर्णव अजय चव्हाण याने भारत सरकारच्या सैनिक मंत्रालयात मार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चंद्रपूर (महाराष्ट्र) सैनिक स्कूलकरीता त्याची इयत्ता सहावीसाठी निवड झालेली आहे. सिव्हिल इंजिनिअर अजय हिंदुराव चव्हाण यांचा तो मुलगा आहे. अर्णव चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण रयत इंग्लिश मिडियम स्कूल सातारा येथे झाले. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा मधील श्री नवनाथ देशमुख व इतर शिक्षक वर्गाचे त्याला मार्गदर्शन लाभले. अर्णवने गणित विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या यशाबद्दल अर्णवचे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय ,पत्रकार, व डिजिटल मीडिया व इतर क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment