फलटण शहरा सह तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस.
फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सव्वाआठ वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाबरोबर वाऱ्याचा वेगही खूप जास्त होता सुमारे पाऊणतास पाऊस धो धो बरसात होता उकाड्याने हैराण झालेल्या फलटण करांना आजच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दुष्काळ असल्या कारणाने फलटण तालुक्यातील गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकरी वर्ग चिंतेत असताना आजच्या पावसाने फलटण तालुक्यातील शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला आहे उकाड्याने हैराण झालेल्या फलटण तालुक्याला आणखीन अशाच दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
Comments
Post a Comment