विसापूर ग्रामस्थांनी केले सेवानिवृत्त कॅप्टन प्रवीण सावंत यांचे भव्य स्वागत.

विसापूर ग्रामस्थांनी केले सेवानिवृत्त कॅप्टन प्रवीण सावंत यांचे भव्य स्वागत.
 
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

विसापूर ता खटाव या गावात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत करत भारतीय लष्करात ३० वर्षे प्रदीर्घ आणि अविरत मातृभूमीची सेवा करून कॅप्टन प्रवीण सावंत यांना  सन्मानित करून  जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावाचे वातावरण एका जल्लोषपुर्ण महोत्सवाचे झाले होते.या कार्यक्रमाला मित्रपरिवार , आजी माजी सैनिक संगठना विसापूर , सगे सोयरे  आणि त्यांच्या बटालियनचे सैनिक मित्र मोठया संख्येने उपस्थित  गावकर्यांनी  भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत मोठ्या उत्साहात भारत मातेच्या या सुपुत्राचे स्वागत केले.विसापूरातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात  जन्मलेले कॅप्टन प्रवीण पतंगराव सावंत हे १ एप्रिल मार्च १९९४ पासून भारतीय सेनेच्या मेकानाइज्ड इंफ्रन्टरी मध्ये कार्यरत होते. शिपाई पदापासून पदोन्नती होत होत, त्यांनी उल्लेखनीय सैन्य सेवा केली आणि त्याबद्दल  त्यांना १५ ऑगस्ट २०२३ ला ऑनररी लेफ्टिनंट आणि त्यानंतर २६ जानेवारी २०२४ ला ऑनररी कॅप्टन या मानद पदावर पदोन्नती मिळाली. संपूर्ण विसापूर गावातील अशी मानद पदोन्नती मिळालेले ते प्रथम सैनिक आहेत .त्यांच्या बटालियन मध्ये ते पारंगत तज्ञ इन्स्ट्रक्टर म्हणून नवीन सैनिकांना प्रशिक्षण देत होते . सेवा निवृत्ती नंतर सुद्धा ते देशसेवेसाठी सदैव तयार आहेत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कॅप्टन प्रवीण पतंगराव सावंत यांनी कमावलेल्या संपूर्ण डेकोरेशन्स मेडल सहित सैनिकी गणवेश परिधान केला.सातारा जिल्ह्याला महान सैनिकी परंपरा आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा रोमांचक आणि गौरवपूर्ण इतिहास आहे. देशसेवेच्या या अखंड प्रवाहात अनेक तरुण , तरुणी आकर्षित होताना दिसत आहेत. सकारात्मक दृष्टीने अग्नीवीर म्हणून भारतीय सेनेत  रुजू व्हावे असे स्पष्ट मत कप्तान प्रवीण यांनी दिले.  आई वडिलांकडून लहानपणी घेतलेले संस्कार, गावातले शिक्षण, अथक परिश्रम आणि पत्नीची साथ  यांच्या बळावर मी उल्लेखनीय देशसेवा करू शकलो असे कप्तान प्रवीण अभिमानाने म्हणाले. यावेळी परिसरातील आमदार आणि खासदार यांचे हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरव करण्यात आला.        सायंकाळी सुंदर फुलांनी आणि तिरंग्याने सजवलेल्या  विशेष गाडीतुन ढोल ताशाच्या  गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत  गावाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी सवाष्ण स्त्रियांनी त्यांचे औक्षण केले. त्यांच्या समवेत मिरवणुकीत पत्नी सौ. मनीषा आणि दोन कन्या प्रणिता , दीक्षा  आणि बंधू  शिवाजी सावंत , रमेश सावंत , बहीण सौ. मनीषा यांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुभेदार (नि .)  गुलाबराव साळुंखे  आणि श्री. हिंदुराव साळुंखे  श्री. किशोर साळुंखे , श्री .तानाजी शिंदे , ज्ञानेश्वर साळुंखे  व ग्रामस्थ उपस्थित होते . सुत्र संचालक डॉ. सुधीर सावंत यांनी केले तर आभार उमेश सावंत यांनी मानले.
मिरवणुकीच्या दरम्यान कप्तान प्रवीण यांनी त्यांना राहत्या घरात प्रवेश करून देव्हार्याला नमस्कार करून मातोश्री आणि वडिलांचे आशीर्वाद घेतले. सर्व उपस्थित नातलगांनी , मित्रपरिवाराने त्याना पुढील आयुष्यास शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. हा गौरवपूर्ण आणि भाग्याचा दिवस बघण्याचे भाग्य मला लाभले असे त्यांच्या वयोवृद्ध मातोश्री सौ. सावित्रा  यांनी अतिशय भावनिक होऊन  सर्वाना सांगितले.  मिरवणुकीच्या शेवटी ग्रामदेवता श्री वाघेश्वरी आणि श्री नवलाबाई यांची कप्तान प्रवीण यांनी सपत्नीक आरती सर्व गावकर्यांसोबत आरती केली. 
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला विसापूरातील शहिद सैनिक स्व.शिपाई गणपत जिजाबा सावंत (जम्मू कश्मीर १९४७), स्व.सुभेदार सोपानराव साळुंखे( भारत चीन युद्ध १९६२) , स्व.सुभेदार श्रीरंग तात्याबा सावंत ( शौर्य चक्र, कोटा राजस्थान पूरग्रस्त मोहीम १९८६ ) आणि स्व.सुभेदार विजय सर्जेराव शिंदे  ( लद्दाख मोहीम २०२२) यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सैनिकी पद्धतीने  मानवंदना सॅल्यूट केला आणि २ मिनिटे मौन ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यानी पुष्पहार घालून दीप प्रज्वलित केले.   
या कार्यक्रमा साठी दूर दूरच्या जिल्ह्यातून कप्तान प्रवीण यांच्या १८ मेकॅनाईज्ड इंफ्रन्टरी (INDOMITABLES  ) बटालियनचे माजी सैनिक हवलदार (नि.) श्री. विठ्ठल पाटील, विजय चौधरी, सोमनाथ साळुंखे , सुबेदार (नि.) विठ्ठल कुदळे , सुबेदार मेजर (नि .) धारेराव पाटील विशेष अतिथी म्हणून आवर्जुन आले होते. त्यांचे कप्तान प्रवीण यांनी स्वागत केले आणि कॅप , शाल , गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सर्वांचा सन्मान केला. यानिमित्ताने सर्वांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सैनिकी परंपरेनुसार रात्री विशेष बडाखानाचे अयोजन करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.