सेवागिरी यात्रेमध्ये पैशाने भरलेले पाकीट होमगार्ड यांनी प्रामाणिकपणे केले परत.

सेवागिरी यात्रेमध्ये पैशाने भरलेले पाकीट होमगार्ड यांनी प्रामाणिकपणे केले परत.


पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

पुसेगाव ता .खटाव येथे सध्या श्री सेवागिरी महाराज रथ उत्सवाची यात्रा सुरू असून या यात्रेमध्ये सातारा जिल्ह्यामधून अनेक लोक यात्रेमध्ये फिरण्यासाठी येतात व यात्रेमध्ये पोलीस व होमगार्ड यांचा चोक बंदोबस्त असतो तर कोरेगाव होमगार्ड पथकातील अधिक शिंदे व सुरज जगदाळे  सेवागिरी यात्रेनिमित्त पुरुष होमगार्ड बंदोबस्त करता नेमलेली आहेत काटकर हॉस्पिटल समोर बेरी कटिंग येथे बंदोबस्तासाठी नेमलेले श्री अधिक शिंदे व सुरज जगदाळे यांना रोडवर एक पाकीट सापडले ते उघडून पाहिले असता त्यात रोख रक्कम 15,000 रु आहेत निदर्शनास आले त्यांनी ते पाकीट ताब्यात घेऊन समादेशक अधिकारी श्री दिपक बर्गे व कोरेगाव होमगार्ड पथकाचे वरिष्ठ पलटण नायक श्री अधिक बर्गे यांना कळवले सदर पाकीटात महत्वाची कागदपत्रे होती त्या कागदपत्रावरील माहिती घेऊन सदर पाकीट हे पवन महावीर पारीख सातारा यांचे असल्याचे लक्षात आले संबंधित व्यक्तीला फोन करून बोलवुन घेतले व पुसेगाव पोलीस स्टेशनला  ठाणे अंमलदार ASI कोळी साहेब यांच्या समक्ष सदर पाकीट यांना देण्यात आले यावेळी कोरेगाव पथकाचे वरिष्ठ पलटन नायक श्री अधिक बर्गे, पुसेगाव पथकाचे प्रभारी अधिकारी श्री गणेश थोरात ,कोरेगाव पथकाचे अधिक शिंदे व सुरज जगदाळे यांचे एपीआय आशिष कांबळे यांनी अभिनंदन केले असून पुसेगाव परिसरातून  प्रामाणिकपणाचे  कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.