सिट्रस चेक इन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब या कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम माघारी मिळवण्यासाठी आमदार महेश शिंदे यांना निवेदन.
सिट्रस चेक इन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब या कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम माघारी मिळवण्यासाठी आमदार महेश शिंदे यांना निवेदन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
खटाव ,माण, कोरेगाव तालुक्यातील अनेक गरीब, गरजू लोकांनी सदर कंपन्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. आकर्षक व्याजदर व इतर अनेक प्रलोभने दाखवून एजंटच्या माध्यमातून या कंपन्यांनी अनेक सर्वसामान्य लोकांना गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले. यामध्ये बऱ्याच चेन सिस्टीम कार्यरत होत्या व त्यांच्या माध्यमातून कंपनीला लाखो, करोडो रूपयांच्या ठेवी जमा झाल्या. या कंपन्यांच्या चेन सिस्टीममधील सिनीयर लोक व कंपनीचे डायरेक्टर यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन लोकांनी हजारो कोटींच्या ठेवी जमा केल्या. सुरूवातीला सदर कंपन्यांनी जमा ठेवी मुदतीनंतर व्याजासह गुंतवणूकदारांना परत केल्या. यामुळे विश्वास वृध्दिंगत होऊन ठेवीमध्ये लक्षणीय वाढ झाली. पुढे 'सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया' अर्थात सेबीने या कंपन्यांच्या आर्थिक व्यवसाय करण्यावर बंदी घातली. नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली मात्र आधी स्वीकारलेल्या ठेवी ग्राहकांना परत करण्यास सांगितले. परंतु सदर कंपन्यांनी आजअखेर ठेवी परत केल्या नाहीत. सध्या या कंपन्यांची केस सुप्रीम कोर्टात चालू असून सन २०१६ पासून आजपर्यंत ७ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे तरी गुंतवणूकदारांना न्याय मिळालेला नाही. लोकांच्या ठेवीतून कंपनीने हजारो कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली असून करोडो रूपयांच्या ठेवी इतर अनेक बॅंकांमध्ये जमा आहेत. तरीही या कंपन्यांनी व सेबीने लोकांच्या ठेवी परत न करता खेळवत ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. दरम्यानच्या या ७/८वर्षाच्या काळात अनेक गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक जण मयत झाले आहेत. एजंट लोकांना गुंतवणूकदारांकडून मानसिक त्रास व प्रसंगी अमानुष मारहाण होत आहे. या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही अद्याप दिले गेले नाहीत. या कंपन्यांमध्ये ठेवी ठेवणारे बहुसंख्य ठेवीदार हे आपल्या कोरेगाव, खटाव व माण तालुक्यातील आहेत.
हे निवेदन देताना भरत मुळे, चंद्रकांत गुजर ,कमलाकर पवार ,मुनाफ मोमीन, मोहन बर्गे ,विठ्ठल तोडकर ,विजय कदम ,कॅप्टन धुमाळ आदी लोक उपस्थित होते.
Comments
Post a Comment