शैक्षणिक संकुले अद्यावत करण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वाचे - माजी मुख्यमंत्री व आमदार श्री पृथ्वीराज चव्हाण.

शैक्षणिक  संकुले अद्यावत करण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वाचे - माजी मुख्यमंत्री व आमदार श्री पृथ्वीराज चव्हाण. 

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त व्हावे ,त्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी, तसेच नवनवीन उपक्रमांची व  उद्योगधंद्यांची ओळख्  होण्याकरता शैक्षणिक संस्था संकुले अद्यावत करणे गरजेचे आहे .या शैक्षणिक संस्था अद्यावत व सर्व सोयींनी युक्त ठेवण्याकरता सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन योगदान दिले तर डॉक्टर राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव सारख्या भव्य व सुसज्ज शालेय इमारती तयार होतील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण घेता येईल. असे विचार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेशरावजी जाधव यांनी संस्था स्थापनेपासून आत्तापर्यंत संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्था करत असणारी मदत तसेच  संस्थेच्या भविष्यातील विविध शैक्षणिक योजनांची देखील माहिती दिली.                    संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी प्रमुख पाहुणे माननीय श्री अनिल दिवेदी यांचा परिचय करून दिला .प्रमुख अतिथी  अॅनेसेक ह्यूमन रिसोर्स सर्विसेस लिमिटेड पुणे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अनिल दिवेदी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज यांनी कार्यक्रमास शुभ आशीर्वाद दिले .तसेच यावेळी डॉक्टर राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल मधील आजी माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले प्राविण्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व विश्वस्त श्री योगेशराव देशमुख यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास एनसिक ह्युमन रिसोर्स सर्विसेस लिमिटेड पुणे या संस्थेचे संचालक मंडळ, संस्था सचिव श्री मोहनराव जाधव ,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, श्री सुभाष आगाशे ,विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव , श्री सुभाषराव जाधव ,श्री विष्णुपंत खटावकर , श्री विलासराव  जाधव , श्री योगेशराव देशमुख ,श्री एस. आर .पाटील,             देवस्थानचे चेअरमन श्री रणधीर जाधव ,विश्वस्त श्री बाळासाहेब जाधव , श्री राजेंद्र शेलार , एडवोकेट विजयराव कणसे, श्री मानाजीराव घाडगे ,श्री महेश नलावडे , श्री अॅड श्रीकांत चव्हाण ,श्री राजेंद्र घाडगे ,      पुसेगावचे सरपंच श्री घनश्याम मसने ,उपसरपंच श्री पृथ्वीराज जाधव, श्री जयंतराव जाधव, श्री के .डी .पवार , श्री डी. पी. शिंदे , विविध शाखांचे मुख्याध्यापक तसेच विविध गावचे सरपंच ,उपसरपंच, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .सौ हेमलता देशमुख यांनी आभार मानले. श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.