झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक धावडसी गावी होण्याची मागणी - सामाजिक कार्यकर्त्या वनिताताई भंडारे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक धावडसी गावी होण्याची मागणी -  सामाजिक कार्यकर्त्या वनिताताई भंडारे.


पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

सातारा जिल्ह्यामधील धावडशी गावच्या माहेरवाशी असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक धावडशी गावांमध्ये उभारण्यात यावे अशी मागणी आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा यांचे अध्यक्षा  वनिताताई भंडारे यांनी निवेदना द्वारे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे या निवेदनामध्ये झाशीच्या राणीचे माहेर ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे  सातारा जिल्ह्यात धावडशी गाव भारत देशभर चर्चेत आले आहे.अशा वीरराणी लक्ष्मीबाई यांनी नारी संघटना स्थापन करून महिलांचे मनोबल वाढवून  इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या अशा शूरवीर, झुंजार ,क्रांतिकारी  राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक धावडशी  या गावी उभारण्यात यावे ही मागणी महिलांमध्ये जोर धरू लागली असून हे स्मारक तयार झाले असता महिलांना  प्रेरणा देणारे त्यांचे मनोबल वाढवणारे प्रेरणास्त्रोत होऊ शकते ,जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मागील व आत्ताच्या पिढी मधील महिलांसाठी त्यांच्या जीवनाची वाटचाल करण्यासाठी  नित्यांत आवश्यकता आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सौ .नयन कांबळे , सौ नीलम भिंताडे , सौ .धनश्री बागडे, सौ कल्पना चाळके आदी महिला निवेदन देताना उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.