ग्राहक हीत समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीपकुमार जाधव.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
ग्राहक हीत समिती महाराष्ट्र ही संस्था ग्राहक हक्क व अधिकार याविषयी 2011 पासून महाराष्ट्र काम करणारी अग्रेसर संघटना आहे. या संघटनेची सर्वसाधारण सभा हिंदुस्तान अँटिबोटिक्स वेल्फेअर सेंटर कॉलनी पिंपरी चिंचवड येथील क्लब हाऊस येथे पार पडली या सभेत संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक पदी काम पाहत असलेले संदीपकुमार जाधव यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक कटारिया यांनी नियुक्तीपत्र देऊन याची अधिकृत घोषणा केली.यावेळी डॉ दीपक कटारिया म्हणाले, दरवर्षी संघटनेमध्ये फेर बदल होत असतात परंतु यावर्षी आपण तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली आहे या नवीन पदाधिकाऱ्यांनी संधीचा उपयोग ग्राहक संरक्षण हितार्थ करावा व संघटनेचे नावलौकि वाढवण्याकरिता प्रयत्न करावे अशी इच्छा व्यक्त केली. समाजात अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे ग्राहकांमध्ये ग्राहकांच्या हक्काविषयी जनजागृती करत संघटना वाढवण्याच्या हेतूने सतत प्रयत्नशील राहील असे मत नवनियुक्त अध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी व्यक्त केले.या बैठकीत अनेक तरुण कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली यामध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड पंडित गायकवाड,ॲड प्रवीण जाधव,ॲड वसंती जाधव,ॲड खेताराम सोलंकी यांची तर सांगली जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल केदारी, उपाध्यक्ष संजय माने सचिव कृष्णांत तरडे कार्याध्यक्ष प्रकाश नांदेले. पाटण तालुका अध्यक्षपदी अशोक कुलगुडे फलटण तालुकाध्यक्षपदी सुनील वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र मदने, सचिव अजित नांदेड, कार्याध्यक्ष ऋषिकेश नलवडे तर पुणे शहराध्यक्षपदी महेश शिर्के, उपाध्यक्ष निखिल भरेकर , कार्याध्यक्ष मंगेश थोरात,सचिव प्राजक्ता जाधव सह सचिव संतोष चौधरी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिल शिंदे व आभार प्रदर्शन प्राजक्ता जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment