आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या महिलांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साताऱ्यात उभारण्याची मागणी.

आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या महिलांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साताऱ्यात उभारण्याची मागणी.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

सातारा येथील आदर्श सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या महिलांनी ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात असंख्य महिलांच्या उपस्थितीत साजरी करण्यात  आली.त्या वेळेस स्त्री शक्तीचा नारा देणाऱ्या व महिलांसाठी शिक्षणाच्या पाया उभा करण्यासाठी ज्यांनी आपलं सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले अशा थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सातारा शहर येथे उभारण्यात यावे यासाठी 
मा.उपजिल्हाधिकारी निवासी पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थिती महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ वनिताताई भंडारे ,अरुणा लोखंडे, नयना कांबळे, भागीरथी निकाळजे ,वैशाली माळी, धनश्री बागडे ,विद्या जाधव , पद्मावती कळसकर, सुनिता बागडे, देशमुख मॅडम, यांच्यासह असंख्य महिलांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत  सातारा जिल्हा क्रांतिकारक व देश सेवेसाठी अनेक शूरवीर सैनिक घडवणारा असून या सातारा शहरांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकर उभे राहावे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी याची दखल घ्यावी  असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या वनिताताई भंडारे यांनी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.