मुधोजी प्राथमिकच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची आकाशात उंच "भरारी"

मुधोजी प्राथमिकच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची आकाशात उंच "भरारी"

 फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी प्रथम शिक्षिका व प्रथम मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी कष्ट केले अशा अक्षर ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर,फलटण या प्रशालेमध्ये न भूतो न भविष्यती असा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आकाशी उंच भरारी घेणाऱ्या गरुडाप्रमाणे साकार झाला.त्यावेळी मा.सौ. शबनम मुजावर मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला तसेच मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप देण्यात आली व या कार्यक्रमास लाभलेल्या अध्यक्षा मा.सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री.रुपेश शिंदे यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले व असा न भूतो न भविष्यती कार्यक्रम आकारास आला व सर्वांचे डोळे दिपून गेले. विद्यार्थ्यांनी कलाकार म्हणून आलेल्या त्यांच्या उत्साहाचे उधाण त्यांच्या नृत्यातून प्रदर्शित केले तर पालकांनी व इतर श्रोत्यांनी दिलेला प्रतिसाद हा पाहण्याजोगा होता.
या वार्षिक स्नेहसंमेलनास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व माननीय गव्हर्निंग कौन्सिल मेंबर,मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर शाळा समितीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक व पालक संघाचे सर्व सदस्य ,अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य तसेच फ. ए.सोच्या इतर सर्व प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालांच्या मा.मुख्याध्यापिका व सर्व बालक मंदिरच्या मा.मुख्याध्यापिका तसेच मा.नगरसेवक श्री किशोरसिंह नाईक निंबाळकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय योग्य मार्गदर्शन व सुसूत्रतेमुळे उत्कृष्ट अशा नियोजनात पार पडला त्यास प्रशालेते सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.