एकंबे प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हीच मंजूर केले : आमदार महेश शिंदे; एकंबे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.

एकंबे प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हीच मंजूर केले : आमदार महेश शिंदे; एकंबे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

शिवसेनेचे ज्याने वाटोळे केले, त्या खासदार संजय राऊत याची दुसरी आवृत्ती म्हणजे कोरेगावचे माजी आमदार आहेत. काही केले तरी मीच केले, असे ओरडून सांगण्यात पलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. एकंबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाकडून जागा आत्ता वर्ग झाली आहे, मग २०१३ साली त्यांनी हवेत प्राथमिक आरोग्य केंद्र कसे मंजूर केलं आणि त्याचा प्लॅन कसा मंजूर केला, याचे उत्तर आता त्यांनीच सर्वसामान्य ग्रामस्थांसमोर द्यावे. काही कर पण खोटं बोल असला धंदा अन् असले उद्योग त्यांनी आता बंद करावेत. आपल्या प्रयत्नातून आणि राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातूनच आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.एकंबे, तालुका कोरेगाव येथे १२ कोटी ७१ लाख २९ हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य गणेश शेळके, माजी उपसरपंच ॲड. राजेश पंढरीनाथ चव्हाण, उपसरपंच श्रुतीन चव्हाण,जयदीप चव्हाण,शिवाजी चव्हाण, किशोर चव्हाण,सतिश चव्हाण व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते.शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली. आम्ही भूमिपुत्र असल्यानेच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावत आहोत, तुमच्यासारखे उपरे नाही. सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम करत आहोत यापूर्वी मतदार संघाची धुरा सांभाळणाऱ्यांनी केवळ स्वतःचा आणि आपल्या बगलबच्चांचा विकास केला. सर्वसामान्य जनतेशी त्यांना काडीमात्र देणे घेणे नव्हते, अशी टीका देखील त्यांनी केली.यावेळी सुनील खत्री, प्राचार्य अनिल बोधे यांची भाषणे झाली. ॲड. राजेश चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तसेच सूत्रसंचालन केले. आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांची एकंबे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर भव्य मिरवणुकीने गावातील श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील कार्यक्रमस्थळी पदाधिकारी दाखल झाले. कार्यक्रमास एकंबे, सायगाव, गोळेवाडी, वागजाईवाडी, शेलटी, खिरखंडी सह ल्हासुर्णे जिल्हा परिषद गटातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.