डॉ. प्रियाताई शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा महागौरव २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
डॉ. प्रियाताई शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा महागौरव २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
संघटनेच्या दुसऱ्या महाअधिवेशनात कण्हेरी मठ, कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार होणार प्रदान.
मुंबई : आरोग्यसेवा व समाजसेवा क्षेत्रात सतत कार्यशील राहून कोरोना सारख्या ऐतिहासिक महामारीच्या संकटकाळात रूग्णांवर उपचार करतानाच समाजाला धीर व आत्मविश्वास देण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. प्रियाताई महेश शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे यांना डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा महागौरव २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य संघटक सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, राहिद सय्यद, अमोल टकले, सचिव राहुल ताटे, खजिनदार संदीप माने, सोमनाथ साखरे, संतोष शिराळे, सुर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती. दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सिध्दगिरी कण्हेरी मठ, कोल्हापूर येथे होत असलेल्या संघटनेच्या दुसऱ्या महाअधिवेशनात हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या अधिवेशनात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, राज्याच्या नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. श्रीनिवास पाटील, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, महाराष्ट्राच्या आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, आ. महेश शिंदे, ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होत आहेत.
Comments
Post a Comment