खटाव तालुक्याचे युवा नेते गणेश भोसले यांचे शेकडो कार्यकर्त्यांसोबत करणार वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश.

खटाव तालुक्याचे युवा नेते गणेश भोसले यांचे शेकडो कार्यकर्त्यांसोबत करणार वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

खटाव तालुकयातील शेकडो कार्यकर्ते तसेच आजी माज़ी ग्रामपंचायत सोसायटी सदस्य सामाजिक चळवळीत काम करणारे असंख्य कार्यकर्ते यांची  दि २९/१२/२०२३ रोजी वडुज येथे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते गणेश भोसले यांच्या नेतृत्वात भव्य मिटींग झाली त्यामधे सर्वानुमते श्री गणेश भोसले यांच्य नेतृत्वात लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले तसेच यापुढे बाबासाहेबांचे नातु व श्रध्येय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितांच्या लढ्यात पुर्ण ताकदीने काम करणार असल्याचे जाहीर केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांची मनोगते झाली  त्यामध्ये पँथर ग्रुप चे अध्यक्ष भगवान मोरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आम्ही सर्व जण तुमच्या सोबत आहोत. लवकरच प्रवेशाची कार्यक्रम वडुज येथे होईल. व खऱ्या अर्थाने संविधान व फुले शाहु आंबेडकर विचारांच्या वंचितमधे पुर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही सर्वांनी दिली. यावेळी तालुक्यातील बाबासाहेब निकाळजे, अजय मदने, सचिन शिंदे,  शंकर येवले,  जितू सोनवले, गणेश यादव, आनंदराव पवार, मिलिंद निकाळजे, गणेश निकम, संतोष बरकडे, संदिप काळे, सुनिल मिसाळ, शिवलिंग शिखरे भिमसैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.