कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी लवकरच मुंबईत व्यापक बैठक बोलवणार; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही, कोरेगावातील रमेश उबाळे यांच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट.

कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी लवकरच मुंबईत व्यापक बैठक बोलवणार; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही, कोरेगावातील रमेश उबाळे यांच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केलेल्या तक्रारी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात मुंबईत पोहोचताच विधान भवनातील दालनामध्ये व्यापक बैठक बोलाविणार असून नगर विकास विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निश्चितपणे जाब विचारला जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.शिवसेना कोरेगाव शहरप्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी कोरेगाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रविवारी दुपारी पावणेतीन वाजता अंबादास दानवे कोरेगाव येथे आले होते. कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे सातारा व सांगली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहरप्रमुख अक्षय बर्गे यांच्या समवेत दानवे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या रमेश उबाळे यांच्या ठिय्या आंदोलनास भेट दिली व  त्यांच्याकडून नगरपंचायतीतील गैरव्यवहारा संदर्भात बारकाईने माहिती घेतली.यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे, गणेश धनावडे, युवानेते प्रीतम बर्गे, डॉ. गणेश होळ, दिनेश सणस, नामदेव गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.रमेश उबाळे यांनी आजचा आंदोलनाचा सातवा दिवस असल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासन नगरपंचायतीतील गैर व्यवहाराला पाठबळ देत असल्याचे सांगितले. अंबादास दानवे यांनी आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली. मुंबईत या संदर्भात व्यापक बैठक घेतली जाईल. रमेश उबाळे यांना त्यासाठी विशेष करून निमंत्रित केले जाईल, असे सांगून गैरव्यवहाराच्या विरोधात महायुती लढा देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.