कोरेगावच्या मुख्याधिकाऱ्यांसह १४ नगरसेवकांची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांची प्रशासनाकडे मागणी निवेदन सादर.

कोरेगावच्या मुख्याधिकाऱ्यांसह १४ नगरसेवकांची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांची प्रशासनाकडे मागणी निवेदन सादर.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कोरेगाव नगरपंचायतीत सुरू असलेल्या गैर व्यवहारासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अचानकपणे शहरातील १४ नगरसेवकांनी माझ्या विरोधात खोटे आरोप करत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांसह १४ नगरसेवकांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.रमेश उबाळे यांच्यासह अमरसिंह बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे व दिनेश सणस यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता
प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व आपल्या ठिय्या आंदोलनामागील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.नगरपंचायतीत सुरू असलेल्या गैरव्यवहार सर्वसामान्यांसमोर मी आणला आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना नगरपंचायतीतील १४ नगरसेवकांना अचानकपणे साक्षात्कार होऊन त्यांनी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी माझ्या विरोधात खोटे निवेदन सादर केले आहे. माझ्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. यातील एक जरी आरोप सिद्ध झाला तर माझ्यावर कायद्यातील कडक कारवाई करावी, मात्र चुकीचे आरोप करणाऱ्यांवर तात्काळ प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी उबाळे यांनी यावेळी केली.दरम्यान, रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतीतील गैरकारभारांचा पाढाच वाचला आहे. शहराचा नवीन विकास आराखडा, त्यावरील आरक्षणे यासह नगरसेवक व मुख्याधिकाऱ्यांवर विविध प्रकारच्या आरोप करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यावर ठाम असून यादरम्यान जीवितास धोका झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील रमेश उबाळे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.