डी. पी. च्या तीन विद्यार्थिनीचे गांधी संस्कार परीक्षेत जिल्हा स्तरावर यश.

डी. पी. च्या तीन विद्यार्थिनीचे गांधी संस्कार परीक्षेत जिल्हा स्तरावर यश.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

 कोरेगाव गांधी रीसर्च फाउंडेशन, जळगाव तर्फे घेण्यात आलेल्या, ‘गांधी विचार संस्कार परीक्षेत’ सातारा जिल्हास्तरावर डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनीनी यश मिळवले आहे. वरिष्ठ विभागातून बी. ए. प्रथमची विद्यार्थिनी कु. मोनाली अंकुश लगस हिने प्रथम क्रमांक, कनिष्ठ विभागातून १२ वी वाणिज्यची विद्यार्थिनी कु. वैष्णवी चंद्रहार जगदाळे हिने प्रथम क्रमांक; तर ११ वी विज्ञान विभागातील कु. अस्मिता रविंद्र मतकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. याप्रसंगी गांधी रीसर्च फाउंडेशनचे जळगाव प्रमुख प्रोफेसर डॉ. गिरीश कुलकर्णी, सहाय्यक विश्वास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय सचिव (मध्य विभाग) एन. टी. निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर डी. जी. कॉलेज, साताराचे कार्यालयीन प्रमुख अशोक मसले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या यशाबद्दल आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार, तसेच डी. पी. भोसले महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, डॉ. बाळासाहेब एस. चव्हाण, प्रशासकीय उपप्राचार्य प्रो. डॉ. बी. एस लोकडे, उपप्राचार्य प्रा. अश्विनी साळुंखे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. कोळेकर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य आर. टी. ढोपे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. या यशासाठी गांधी विचार संस्कार परीक्षा वरिष्ठ समन्वयक प्रा. महाले एम. बी. व कनिष्ठ समन्वयक, प्रा. एस. एस ढाणे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.