कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहारप्रकरणी प्रशासनाने न्याय न दिल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार : आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा; रमेश उबाळे यांच्या आंदोलनास दिला पाठिंबा.

कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहारप्रकरणी प्रशासनाने न्याय न दिल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार : आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा; रमेश उबाळे यांच्या आंदोलनास दिला पाठिंबा.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

विकास कामांना आमचा कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. मात्र विकासकामांच्या आडून गैरकारभार आणि गैरप्रकार घडत असतील, तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेल्या नगरपंचायतीच्या विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याबाबत प्रशासनाने न्याय न दिल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी असणाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी रमेश उबाळे यांनी सोमवारी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व रमेश उबाळे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उबाळे यांच्याकडून नगरपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सखोल माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर नानासाहेब बर्गे, दिनेश सणस, डॉ. गणेश होळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या गैर कारभाराविषयी जोरदार टीका केली. याविषयी विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने थातूरमातूर उत्तर दिले आहे. दुसरीकडे विकास कामांच्या आडून अधिकारी वर्ग चुकीचे मार्ग अवलंबत आहे. त्यातून दुसऱ्याच गोष्टी साध्य केल्या जात असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. याविषयी जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यांनी न्याय न दिल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांबाबत दुजाभाव केला जात असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.