रोड रॉबरी करणाऱ्या पाच आरोपींसह तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

रोड रॉबरी करणाऱ्या पाच आरोपींसह तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

 सातारा येथील खिंडवाडी ते शिवराज फाटा जाणाऱ्या सर्विस रोडवरील वनविभागाच्या झाडीमध्ये काही इसम हत्यारेनिशी जमले असून ते रोड रॉबरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाल्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पथकास त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळतात पथकाने तात्काळ या ठिकाणी रवाना होऊन इसम पोलिसांची चाहूल लागतात ते अंधाराचा व झाडीचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले परंतु पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी इसमांचा अंधारात व काटेरीझाडी झुडपात  पाटला करून जीवाची परवा न करता शिताफीने त्यांना पकडण्यात यश आले यामध्ये १)अमीर सलीम शेख , २)अमीर इम्तीयाज मुजावर, ३)आलिम नजीर शेख, ४)यश सुभाष साळुंखे , ५)अभिषेक उर्फ अबू राजू भिसे. हे पळून निकीट बंटस हॉटेलच्या पाठीमागे मोळाचा वडा सातारा हे आरोपी पकडले असून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीची पिस्टल ,चार जिवंत काडतुसे,  दोन सुरे व सहा मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी रोड रॉबरी करण्याकरिता येथे आलो असल्याचे सांगितल्याने त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या मोहिमेमध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे ,पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील ,विश्वास शिंगाडे ,पोलीस अंमलदार अतिश घाडगे ,संतोष सपकाळ ,संजय शिर्के ,विजय कांबळे, शरद बेबले, निलेश फडतरे ,लक्ष्मण जगधने ,प्रदीप फडतरे, अविनाश चव्हाण ,गणेश कापरे, लैलेश फडतरे ,अरुण पाटील ,अमित माने ,स्वप्निल कुंभार ,अमित सपकाळ, ओमकार यादव, मोहन पवार, विक्रम पिसाळ ,विशाल पवार, रोहित निकम ,पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने ,वैभव सावंत ,मयूर देशमुख ,शिवाजी गुरव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला असून अधिकारी व अंमलदार यांचे सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती  आंचल दलाल मॅडम यांनी अभिनंदन केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.