कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उबाळे यांचा एल्गार आंदोलन:अजित जगताप.

कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उबाळे यांचा एल्गार आंदोलन:अजित जगताप.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कोरेगाव दि: कोरेगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सध्या भ्रष्टाचाराचे पीक वाढले असून त्यामुळे कोरेगावातील करदाते यांना मौन धारण करण्याची वेळ आलेली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष व युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी एल्गार पुकारला आहे. दिनांक १५ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
नगरपंचायत कोरेगाव यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात केलेले"भ्रष्टाचार",याविषयी  चार निवेदन दिली होती.  कोरेगाव नगरपंचायत कार्यालयाबाहेर१५/१/२०२४ पासून २५/१/२०२४ पर्यंत ठिय्या आंदोलन करणार होतो परंतु कोरेगाव नगरपंचायती समोर जागा नसल्याने, वाहतुकीस अडथळा होऊ शकतो, नागरिकांची गैरसोय होऊ शकते, म्हणून त्या ठिकाणा ऐवजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर बसून करण्याची भूमिका रमेश उबाळे यांनी घेतली आहे. कृपया आमच्या निवेदनाची आपण दखल घ्यावी व कोरेगाव नगरपंचायत मुख्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे .त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. अन्यथा 26 /1/24 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर "आत्मदहन "करणार आहे याला सर्वस्वी जबाबदार सर्व शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी असतील. असे ही नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.