जुन्या पेठेतील नागरिक पाण्यासाठी आक्रमक; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या.
जुन्या पेठेतील नागरिक पाण्यासाठी आक्रमक; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव शहरातील जुनी पेठ प्रभागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई भासत आहे. नागरिक व महिला अक्षरश: वैतागल्या असून, नगरपंचायत प्रशासन नागरिकांकडे लक्ष देत नाही. नगरपंचायतीच्या कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिक व महिलांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.हेमंत बर्गे यांनी नगराध्यक्षा दीपाली बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे हे पाणी प्रश्नावर गार्ंभीयाने विचार करत नाहीत, अनेकदा तक्रारी करुन देखील, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही, असा आरोप केला. जुन्या पेठेतील नाळे विहीर नगरपंचायतीने तात्काळ अधिग्रहण करावी आणि दोनच दिवसात पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नगरसेवक हेमंत बर्गे यांच्यासह महिलांनी केली आहे.
Comments
Post a Comment