ल्हासुर्णेकर ग्रामस्थांचा आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश.

ल्हासुर्णेकर ग्रामस्थांचा आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या ल्हासुर्णे गावाचा चेहरामोहरा आमदार महेश शिंदे यांनी अल्पावधीत बदलला आहे. या गावासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला असून त्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खटाव येथील निवासस्थानी भेट घेऊन आमदार महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. 
कोरेगाव तालुक्याच्या राजकीय वाटचालीमध्ये ल्हासुर्णे गावाला अनन्य साधारण महत्व आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोरेगावातून आमदार झालेल्या शशिकांत शिंदे यांनी येथे निवासस्थान बांधले आणि 
ल्हासुर्णेकर ग्रामस्थ म्हणून सर्वत्र हजेरी लावू लागले. गावातील मतदार यादीत देखील त्यांनी आपले स्वतःचे नाव नोंदवले होते. जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ल्हासुर्णेकर ग्रामस्थ झाल्यावर बनले होते. मात्र त्यांनी ल्हासुर्णे गावाला अपेक्षित साथ दिली नाही. विकासकामे केली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वावर नाराज होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ल्हासुर्णे गावाने आमदार महेश शिंदे यांना भरभरून मतदान केले व विजयी करण्यात मोठा हातभार लावला होता.आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी सरपंच किसनराव सावंत, प्रशांत संकपाळ, पोपटराव सावंत विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मचिंदर प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाची वाठ धरली. आमदार महेश शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत.
ल्हासुर्णे येथे नुकत्याच झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आमदार महेश शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातून वेळ काढत उपस्थिती लावली, केवळ उपस्थित राहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी फुगडीचा आनंद देखील लुटला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावचा मोठ्या प्रमाणावर विकास करणार असल्याचे शब्द दिला होता. त्यास अनुसरून सोमवारी   विकास सोसायटीचे संचालक सोमनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ माने, ज्येष्ठ ग्रामस्थ हणमंतराव घाडगे, संजय घाडगे, प्रकाशराव घाडगे, शंकरराव घाडगे, रवींद्र घाडगे, संदीप माने, राजेंद्र घाडगे यांनी आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले.आमदार महेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व ल्हासुर्णे गावासाठी जास्तीत जास्त विकासनिधी देण्याची ग्वाही दिली.यावेळी माजी सरपंच किसनराव सावंत, प्रशांत संकपाळ, पोपटराव सावंत, विद्यमान सरपंच संतोष चव्हाण, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मचिंदर, प्रदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संपतराव सावंत, सुहास बर्गे, तुकाराम सावंत, कपिल चव्हाण, धनाजी सावंत, सचिन सावंत, हरिश्चंद्र सावंत, विकास सोसायटीचे संचालक सोमनाथ सावंत, संतोष सावंत, राहुल सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ल्हासुर्णे गावाची हायटेक वाटचाल
आमदार महेश शिंदे यांनी  ल्हासुर्णे ग्रामस्थांनी निवडणुकीत दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देत दर्जेदार आणि ठोस विकास कामे मार्गी लावली आहेत, त्यातील बहुतांशी कामे पूर्णत्वाकडे गेली असून काही कामे मंजूर झालेली आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेसाठी एक कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला असून ती योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. जिल्हा नियोजन समितीतून साकव पुलासाठी ५६ लाख रुपये निधी दिला असून हा पूल बांधून पूर्ण झाला आहे. ल्हासुर्णे - कुमठे 
रस्त्यासाठी चार कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गावात अंतर्गत काँक्रीट रस्ते व बंदिस्त गटारे करण्यात आली असून त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारली जात असून त्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण मागणी लक्षात घेऊन जलसंधारण विभाग अंतर्गत एक कोटी रुपयांचे दोन बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आठ किलोमीटर अंतराचे पाणंद रस्ते देखील पूर्ण करण्यात आले आहेत. गावात सुरू असलेली विकास कामे लक्षात घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला आहे, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. येणाऱ्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.