महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण.
महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण.
पुसेगाव विशेष प्रतिनिधी, पंकज कदम.
जोतिबावाडी,रत्नागिरी ता. पन्हाळा. जि. कोल्हापूर येथे
श्री ज्योतिर्लिंग अर्थात देव केदारनाथ ब्रह्म ,विष्णू ,महेश या तीनही देवांसह जमदग्नीचा रवांश आणि 12 सूर्याचा तेज यांचा एकत्रित अवतार आहे. अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंचाही समावेश आहे त्यामुळे भगवान नारायणाचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा प्रिय असणारी 56 भोगाची सेवा मार्गशीष गुरुवारच्या निमित्ताने श्री केदारनाथ यांना अर्पण करण्यात आले आहे .नाद केदार हे जगाचे पोषक आहेत जगाचे स्वामी आहेत. त्यामुळे विश्वाचा सांभाळ करणाऱ्या या जगन्नाथाप्रति कृतज्ञता म्हणून ही सेवा अर्पण करण्यात येते परमेश्वराला अर्पण करू ते सहस्त्रपटीत भक्तांना परत मिळते, व नाथ केदारनाथाच्या भक्तांना अखंड अन्नधान्य सुख संपदा प्राप्त व्हावी व याकरता नाथांना ही 56 भोग अर्पण करण्यात येत आहेत, केवळ पोट भरण्यासाठी चे साधन म्हणजे अन्न नव्हे तर कडू ,गोड ,आंबट ,तुरट ,खारट, अशाच नवीन सह भक्ष्य म्हणजे तोडून खाण्याजोगे चपातीची ,पोळी, भाकरी , भाज्या,( कालवून खाण्यासारखे भात वगैरे) लोह (चाटून खाण्यासारखे चटणी लोणची) पेय (पिण्यासारखे) चोष्य चोखून खाण्यासारखे( शेवग्याच्या शेंगा ऊस वगैरे) अशा प्रकारच्या सर्व अन्नाची समृद्धी भक्तजनांच्या घरांमध्ये यावी अखंड जीवनसृष्टीतील कोणीही जीव अन्न पाण्यावाचून उपाशी राहू नये अशी माहिती गजानन उपारे( काका) पुजारी यांनी दिली तर या कार्यक्रमात विविध गावचे भक्त ,ग्रामस्थ, महिला, सर्व गुरव समाज हजर होते तर हा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment