अप्पासाहेब घोरपडे यांना भटिंडा पंजाबला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
पंजाब राज्यामध्ये भटिंडा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला हे अवॉर्ड हेल्प निडी फाउंडेशन संस्थापक मनोज जैन सर यांनी रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पूर्ण भारतातील रक्तदात्यांसाठी आयोजित केला होता. यामध्ये सातारा जिल्ह्यातील रणसिंगवाडी येथील आप्पासाहेब शिवाजी घोरपडे यांना नॅशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .आप्पासाहेब घोरपडे यांचं हे तिसरं नॅशनल अवॉर्ड आहे.आप्पासाहेब घोरपडे हे 2015 पासून रक्तदान क्षेत्रात कार्य करीत आहेत .पुढे जात असताना २० डिसेंबर 2020 रोजी आप्पासाहेब घोरपडे यांनी हर्ष फाउंडेशन ची स्थापना केली. हर्ष फाउंडेशन पदाधिकारी कोणताही रुग्ण रक्त मिळाले नाही म्हणून दगाऊ नये यासाठी काम करत असतो व रक्तदातांचे रक्तदान गेल्यानंतर त्यांच्या सुरक्षितता विचार करून विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक रक्तदात्यास 5 लाखाचा अपघाती विमा सुरू केला. आतापर्यंत 2000 प्लस रक्तदात्यांचा अपघाती विमा करून देण्यात आलेला आहे.
या अपघाती विमा मधून गंगाराम काळे ह्या रक्तदात्यांचे अपघाती मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या घरच्यांना 5 लाख सुद्धा मिळवून देण्यामध्ये हर्ष फाउंडेशनचा मोलाचा सहभाग होता .हर्ष फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी हे पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी मोफत रुग्णसेवा, रक्तदान सेवा करत असतात हर्ष फाउंडेशन चे व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे रक्तदान चे हे काम चालते. आप्पासाहेब घोरपडे हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष असून ते श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुद्धा आहेत.आप्पासाहेब घोरपडे यांना याआधी सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय लेव्हलला पुरस्कार मिळालेले आहेत. या आधी त्यांना कारगिल योद्धा नायक दीपचंद सर जी यांच्याकडून बिकानेर या ठिकाणी इंटरनॅशनल ग्लोबल ह्युम्युनिटी अवॉर्ड या सन्मानित करण्यात आले होते तसे भारतीय पोस्ट ऑफिस यांच्याकडून 12 तिकीट देऊन सन्मानित करण्यात आले होते मुंबई पोलीस बांधवांना कोरोनाच्या काळामध्ये 500+ प्लाजमा मदत केल्यामुळे मुंबईचे अतिरिक्त आयुक्त श्री देसाई साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.
Comments
Post a Comment