युवाशक्तीला प्राधान्य देऊन विकासकामांच्या प्रवाहात आणणार : आ. महेशजी शिंदे;
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील युवाशक्तीला प्राधान्य देऊन विकासकामांच्या प्रवाहात आणले जाणार आहे. युवाशक्ती बळकट झाली तर गावे बळकट होतील आणि पर्यायाने देश बळकट होईल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तालुका सातारा येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सौरभ आनंदराव भोईटे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत खटाव येथील निवासस्थानी आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते.मतदारसंघातील प्रत्येक गावात ठोस आणि दर्जेदार विकास कामे केली आहेत, ही कामे करत असताना कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर विशेष भर दिला आहे. जर मनभेद आणि मतभेद दूर झाले तर गावचा विकास कोणी रोखू शकत नाही, अशी आपल्याला खात्री आहे. सौरभ आनंदराव भोईटे यांनी विकासाच्या मार्गावर जाण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्तुत्य आहे त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना निश्चित मानसन्मान दिला जाईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.सौरभ भोईटे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या कामाची पद्धती पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिहे येथील युवा नेते विक्रमसिंह फडतरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय फडतरे, माजी सरपंच अजित फडतरे, उपसरपंच बजरंग फडतरे, आनंदराव भोईटे, आरोग्य कक्षाचे प्रमुख संदीप फणसे, प्रशांत फडतरे, सुधाकर फडतरे, विलासआबा फडतरे, हणमंत गोरे,अंकुश फडतरे, हणमंत फडतरे, बापुराव फडतरे, पै.सतपाल फडतरे, बाळासाहेब फडतरे फडतरे, सुरज फडतरे, नितीन देवगुडे, आदेश फडतरे, सुरज भोसले, सागर फडतरे, गणेश फडतरे, हरिभक्त परायण हणमंत माने, जगन्नाथ फडतरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिहे गावात नव्या विकास पर्वाला प्रारंभआमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून जिहे गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. जिहे स्टँड ते कठापूर कृष्णा नदी पुलासाठी ३ कोटी २५ लाख रुपये, ग्रामसडक योजनेअंतर्गत हायस्कूल शाळा ते माळीनगर रस्त्यासाठी २ कोटी रुपये, गावातील अंतर्गत रस्ते व पार चौक सुशोभीकरण करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, महावितरण कंपनीच्या माध्यमातून १३ विजेचे खांब आणि १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर तात्काळ काम मंजूर करून काम केले आहे. देशमुख आळीत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख रुपये, आणि वाढीव पेव्हर ब्लॉकसाठी पुन्हा १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बौद्ध विहारसाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जन सुविधेतून स्टँड वसाहत रस्ता काँक्रीटीकरणासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आजी -माजी सैनिक संघटनेसाठी स्वतंत्र संकुलासाठी २५ लाख रुपयांच्या निधीस तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. एकूणच आमदार महेश शिंदे यांच्या कामाची पद्धत आगळीवेगळी असून हे गाव आता नवीन स्वरूपात ओळखले जाणार आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.
Comments
Post a Comment