बुधच्या उपसरपंचपदी अभयसिंह राजेघाटगे यांची वर्णी.

बुधच्या उपसरपंचपदी अभयसिंह राजेघाटगे यांची वर्णी.                 

    पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम
  
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील बुध  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनशक्ती विकास पॅनेलचे अभयसिंह उदयसिंह  राजेघाटगे यांची ११विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले .                     आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त माजी सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास पॅनेलच्या लोकनियुक्त सरपंच सौ . सुजाता दत्तात्रय बोराटे व . दहा  ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते . तर विरोधी लोकसेवा विकास पॅनेलला तीन जागा मिळाल्या होत्या . तर अन्य दोन पॅनेलचा दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते .         आज सरपंच सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत सदस्यांची सभा झाली . यावेळी जयवंत आनंदराव जगदाळे , शारदा शिवाजी कचरे, सुमेधा अजित घाटगे , हरिदास कांतीलाल जाधव ,रेश्मा राहुल खवळे, मनिषा मुरलीधर चव्हाण , राजुल रामचंद्र बोराटे , उज्वला शशिकांत घाटगे , दिपाली नागनाथ  कुंभार, अभयसिंह उदयसिंह राजेघाटगे , विवेक रघुनाथ जगदाळे ,  प्रशांत विजय खराटे ,प्राजक्ता  ऋुतुराज कदम  उपस्थित होते .   निवडणूक निरीक्षक म्हणून दळवी , तलाठी ढोले , ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी काम पाहिले . यावेळी उपसरपंचपदासाठी झालेल्या मतदानात  अभयसिंह राजेघाटगे यांना ११ मते तर प्राजक्ता कदम यांना ३ मते पडली . त्यामुळे . अभयसिंह राजेघाटगे यांना विजयी घोषीत करण्यात आले . या निवडीबद्दल त्यांचे आमदार महेश शिंदे , डॉ . अरूणाताई  बर्गे , डॉ . प्रियाताई  शिंदे , श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव , भरत मुळे , सरपंच सुजाता बोराटे , माजी उपसभापती लहुकुमार मदने , माजी सरपंच नवनाथ फडतरे , हणमंत शिंदे , ग्रामस्थ ,  ग्रामपंचायत सदस्य व जनशक्ती विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.