उंब्रज पोलीस वनविभाग यांची संयुक्त कारवाई खैराची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात यश.

उंब्रज पोलीस वनविभाग यांची संयुक्त कारवाई खैराची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात यश.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

उंब्रज पोलीस स्टेशन व वन विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये खैराची अवैद्य वाहतूक करणारा ट्रक शिताफीने पकडण्यात मिळाले यश यामध्ये उंब्रज गावच्या हद्दीमध्ये दिनांक 6 12 2023 रोजी पहाटे पाच वाजता उंब्रज ते पाटण जाणाऱ्या रोडवर दिग्विजय पेट्रोल पंपा समोर पोलीस व वन विभाग यांच्या कर्मचाऱ्यांनी  सापळा रचून अवैद्य खैराची लाकडाची वाहतूक करणारा ट्रक एमएच 15 डी .जे .नंबर 47O7 यामध्ये खैराच्या झाडाची लाकडे पकडण्यात आली अधिक चौकशी करून त्याचे नाव विचारल असता परगट सरर्वनसिंग देवल (वय 38 वर्षे) रा. इगतपुरी. ता. इगतपुरी, जिल्हा. नाशिक असे सांगितले असून सदर ट्रकची पाहणी करत ट्रक मध्ये खैराची लाकडे दिसून आली सदर खैराची लाकडाबाबत चालक यांच्याकडे विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिल्याने ट्रकचालक व ट्रक यांना उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले, व पुढील तपासासाठी , वन क्षेत्रपाल कार्यालय कराड  यांच्याकडे ट्रक चालक परगट देवल याला देण्यात आले.या संयुक्त कारवाईमध्ये उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षण सातारा महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल कराड तुषार नलवडे ,पोलीस हवालदार दिनेश भोसले, श्रीधर माने, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन  खंडागळे, वनरक्षक अरविंद जाधव, होमगार्ड रविराज जंगम, विजय घाडगे . वन पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहिमेत भाग घेतला सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम, उपविभागीय पोलीस सातारा आदिती भारद्वाज, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या यशस्वी कारवाई मधील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.