ग्रामीण विकासासाठी सहकार चळवळ, शेती व अन्य व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचे:प्रो. डॉ. ए.सी.मोहपात्रा.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव – दि. ग्रामीण विकासात भारतापुढे अनेक समस्या व आव्हाने निर्माण झाली असून खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास साधायचा असेल तर सहकार चळवळ, शेती व अन्य व्यवसायाकडे गंभीयाने लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने शासन स्तरावर ज्या काही मुलभूत योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागाचा चांगल्या पद्धतीने विकास होतो असे मत प्रो. डॉ. ए.सी. मोहपात्रा यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी.पी. भोसले महाविद्यालयात भूगोल व ग्रंथालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण विकासात भारतापुढील समस्या व आव्हाने या विषयावरील एक दिवसीय आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रात सिलोंग येथील नॉर्थ हिल विद्यापीठातील माजी भूगोल विभागातील प्रो. डॉ. ए.सी. मोहपात्रा हे बीजभाषक म्हणून बोलत होते. तर कार्याकामाच्या अधक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व पदवी व पद्वुतर विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब चव्हाण म्हणाले स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर कालखंडातील ग्रामीण विकासात भारतापुढे असलेल्या विविध समस्या व आव्हाने वेगळ्या स्वरूपाची आहेत. सध्याच्या समस्या व आव्हानाचा संशोधान्त्मक अभ्यास होऊन त्यासाठी असलेल्या अनेक पूरक बाबी प्रभावीपणे राबविल्या जाव्यात. या मध्ये शेतकरी व्यावसायिक व आर्थिक विकासाला शासन स्तर चालना देणे गरजेचे आहे. पहिल्या सत्रात तज्ञ साधन व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागाचे अधक्ष प्रो. डॉ. बी.एस. जाधव म्हणाले की खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विकास हा केंद्र बिंदू माणून रोजगार, शेती, आर्थिक व व्यवसायपूरक वेगवेगळ्या असणाऱ्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. दुसऱ्या सत्रामध्ये ग्रामीण विकासासमोर असलेल्या समस्या व उपाय या विषयावर शिवाजी विद्यापीठातील भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. संभाजी शिंदे तर तृतीय सत्रामध्ये ग्रंथालय ग्रामीण विकासातील योगदान या विषयावर वाई येथील किसनवीर महाविद्यालायातील ग्रंथपाल डॉ. एस.पी. कांबळे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
या राष्ट्रीय चर्चासत्रात महाविद्यालाय विकास समितीचे सदस्य व माजी प्राचार्य अरुण बर्गे, प्रशासकीय उपप्राचार्य प्रो. डॉ. वी.एस. लोकडे, उपप्राचार्य आर.टी. ढोपे, उपप्राचार्य एस.एन. कोळेकर उपप्राचार्या ए.एस. साळुंखे, विविध महाविद्यालायातील भूगोल विषयांचे ग्रंथपाल कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विविध विषयाचे विभाग प्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्याकामाचे प्रास्तविक व स्वागत पदवी व पदवीतर भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस.एस. यादव यांनी केले. चर्चासत्राचे संयोजन म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख डी.डी. पाटील व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सचिन निकम, शितल पवार यांनी केले तर समन्वयक म्हणून डॉ. एम.बी. हांडे व सहसमन्वयक ग्रंथपाल डी.आय. शिंगाडे, यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. कुशल राऊत, प्रा. एस.पी. माने यांनी केले. तर आभार एस.जी. निकम यांनी मानले.
राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना प्रो. डॉ. ए.सी. मोहपात्रा (सीलोंग) व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रो. डॉ. एस.डी. शिंदे, प्रो. डॉ. बी.एस. जाधव व प्रो. डॉ. एस.पी. कांबळे आदी मान्यवर
Comments
Post a Comment