बीएसएनएलच्या ठेकेदारावर कारवाई करावी:-युवा नेते धीरज जाधव.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सातारा पंढरपुर महामार्गालगत सातारा ते म्हसवड केबल पुरण्याचे काम सुरु असून रस्त्याची साईडपट्टी उकरुन या केबल पूरल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या बीएसएनएल कंपनी च्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.
सातारा पंढरपुर सीमेंट कांक्रिट च्या रस्त्या लगत ची साईड पट्टी तयार करताना मूरूम टाकून पाणी मारून रोलिंग करून पीचिंग केले गेले होते परंतु बीएसएनल कंपनीच्या ठेकेदाराने कोणताही विचार न करता रस्त्याचे शोल्डर तोड़ण्याचे काम केले आहे.पुसेगाव, उंबरमळे, कटगुण, शिंदेवाड़ी निढल येथे जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली रस्त्याची एकूण रुंदी १४ मीटर असून त्यात मुख्य दुपदरी रस्ता हा दहा मीटर आहे आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मीटर अंतराचे शोल्डर म्हणजे मुरमी रस्ता आहे . हा मुरमी रस्ता खोदण्याचा अधिकार या बीएसएनएल कंपनी व ठेकेदारास कोणी दिला ? असे धीरज जाधव यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे .महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तथा एमएसआरडीसी ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था असून त्यांच्या अधिकाऱ्याना सबंधित कंपनी आणि ठेकेदार यांचेवर कारवाई करण्याचे गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असूनही त्यांनी या प्रकारणाकड़े पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.तरी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे रोलिंग करून रस्ता पूर्वी प्रमाणे तयार करून देण्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी प्रसिद्धि पत्रका द्वारे केली आहे .
Comments
Post a Comment