विकसित भारत संकल्प यात्रा आज शिरढोण मध्येआयोजित.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव, दिनांक २२: केंद्र सरकार तसेच; राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेतील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'आपला संकल्प विकसित भारत' या ध्येयास अनुसरून 'विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत केंद्रीय कंपनी व्यवहार या खात्याच्या सहसचिव अनिता शाह या शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी शिरढोणमध्ये संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या यावेळी अर्चना वाघमारे क्रांती बोराटे हे अधिकारी तसेच गटविकास अधिकारी किशोर माने, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, विकास यात्रेचे पदाधिकारी रणजीत फाळके, रुपेश पिसाळ, श्रीमती गोळे उपस्थित होत्या. शासनाच्या विविध विभागांचे विस्तार अधिकारी , कर्मचारी, तसेच ग्रामसेवक,तृप्ती जाधव.सरपंच, संदिप साळुंखे.उपसरपंचअमोल गुजर.व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजना रथाचे पूजन करण्यात येऊन प्रतिज्ञा म्हणण्यात आली.घरकुल योजना ,उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत इत्यादी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच त्यांना लाभाचे, प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळाला ,याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येणार आहेत .महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच घरकुल योजना, रोजगार हमी योजना ,आयुष्मान भारत इत्यादी योजनांची योजनांचा लाभ कशाप्रकारे मिळाला. याबाबत विविध लाभार्थीनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंधरा नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान ही यात्रा रोज दोन गावांमधून प्रवास करणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग, आरोग्य विभाग ,अंगणवाडी विभाग यांनी विविध प्रकारची माहिती देणारे प्रदर्शन तसेच सेवा आयोजित करण्यात येत आहेत. विविध विभागांचे कर्मचारी अधिकारी विविध योजनांची माहिती जनतेसमोर सादर करीत आहेत तसेच कृषी खात्यातर्फे ड्रोन प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात येत आहे. अनिता शहा यांनी सर्व स्टॉलची पाहणी केली आणि सर्व विभागांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले विक्रमी कवितेचे "भारतीय संस्कृती" पुस्तक अनिता शाह यांना भेट देण्यात आले.
Comments
Post a Comment