देगावांमधील चार जणांना सातारा पोलिसांनी जिल्ह्यातून केले तडीपार.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा चोरटी दारू विक्री करणारे व त्याचबरोबर इतर लोकांना गंभीर दुखापत पोचवणे, यामधील चौघांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले तर टोळीप्रमुख अशोक वामन जाधव वय 55 वर्ष, टोळी सदस्य सविता अशोक जाधव वय 48 वर्ष ,अमर अशोक जाधव वय 55 वर्ष, अमित अशोक जाधव वय 19 वर्ष ,राहणार देगाव. तालुका. वाई, यातील टोळी मधील इसमांना गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृतीमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेतून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सातारा यांच्याकडे सादर केलेला होता प्रस्तावाची चौकशी बी. वाय. भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती.
तर या कामी हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकारी पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती ऑचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हा शाखा सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव ,पोलीस प्रमोद सावंत, केतन शिंदे ,अनुराधा सणस, व भुईंज पोलीस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते ,यांनी पुरावे सादर केले आहेत.नोव्हेंबर 2022 पासून 14 उपद्रवी टोळ्यांमधील 46 इसमांना तडीपार करण्यात आले आहे भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारी मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या खडक कारवाई करण्याचे करणारे येणार आहेत असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment