जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कोरेगावात पंचायत समिती कर्मचाऱ्यांची निदर्शने.

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कोरेगावात पंचायत समिती कर्मचाऱ्यांची निदर्शने.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

सातारा ,दिनांक 14: जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे भरावीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे इत्यादी विविध मागण्यांसाठी कोरेगाव पंचायत समिती समोर  कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 14 डिसेंबर पासून विविध मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची शिक्षकांचा बेमुदत संप सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती समोर शिक्षक विस्तार अधिकारी ग्रामसेवक लिपिक सेवक इत्यादी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी यासाठी राज्यभर संप चालू आहे नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी मोर्चा देखील काढण्यात आला परंतु तेथे ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे विविध संघटनांनी 14 डिसेंबर पासून करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अंतर्गत जिल्हा पातळी तसेच तालुका पातळीवर निदर्शने करण्यात येत आहेत तसेच तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी आदी अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात येत आहेत . दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील तहसीलदारांना देखील निवेदन देण्यात आले .तसेच पंचायत समिती कार्यालयासमोर प्रांत अधिकारी श्री अभिजीत नाईक हे एका निवडणूक विषयक आढावा बैठकीसाठी आले असता त्यांना देखील निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे अत्यावश्यक कामकाज वगळता इतर कामकाज आपण नियोजित करू नये अशी विनंती करण्यात आली ती विनंती प्रांताधिकारी यांनी मान्य केली. यावेळी निलेश बर्गे, यशेंद्र क्षीरसागर इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.