आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे पंचायत समिती तर्फे आयोजन.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव, दिनांक १: येथील पंचायत समितीतर्फे 3 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी "दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 चे पंचायत समिती कार्यालय येथे दिव्यांग बंधू भगिनीं समोर वाचन करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना त्यांना मिळणारे विविध सवलती तसेच; दिव्यांगांसाठीचे विविध कायदे याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी निबंध वक्तृत्व रांगोळी इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी विषयाचे बंधन नाही. विषय सामाजिक, शैक्षणिक असावा .दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. दिव्यांगांचे 21 प्रकार असून त्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध सोयी सुविधा शासनाकडून वेळोवेळी दिल्या जातात. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येते. त्या अनुषंगाने शासनाच्या पाच टक्के मधून दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना सवलती आणि उपक्रम यांची माहिती देण्यात येणार आहे दिव्यांगांची विविध कायदे सवलती आणि योजना यांची माहिती दिव्यांगांना असणे गरजेचे आहे त्या संदर्भात विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री.माने यांनी दिली.
Comments
Post a Comment