सालपे येथील सख्ख्या भावांना खुणाच्या खटल्यात जन्मठेप.

सालपे येथील सख्ख्या भावांना खुणाच्या खटल्यात 
जन्मठेप.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

सालपे  ता. फलटण गावच्या हद्दीत सालपे बस स्टॅन्ड जवळ लोणंद ते सातारा जाणार रोड लगत कैलास हॉटेल समोर पिंपळाच्या झाडाच्या खाली यातील सालपे गावातील सौरभ संजय जगताप व त्याचा भाऊ गौरव संजय जगताप यांनी आपणास संगमत करून दारू पिण्याच्या कारणावरून बापू संभाजी निकम वय 38 वर्ष राहणार शरेचीेवाडी ता. फलटण यास लाकडी दांडक्यानी त्याच्या डोक्यात, कपाळावर ,डाव्या हाताच्या मनगटावर, छातीवर, बरकडीवर मारहाण करून त्याचा निघृण खून केला होता. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर खटला श्री एस. एस. अडकर प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सातारा,  यांच्या कोर्टात सुनवाणी चालू होती सरकार तर्फे श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले नमूद केस मध्ये एकूण 11 साक्षीदार तपासले त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार तसेच पोस्टमार्टम करणारे वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या केवळ परिस्थिती जन्यपुरावा व अनेक साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांच्या युक्तिवाद व आरोपींनी केलेल्या कृत्याबाबत न्यायालयाच्या समोर आलेल्या पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश यांनी आज दिनांक 30. 11 .2023 रोजी यातील आरोपी सौरभ संजय जगताप व गौरव संजय जगताप या दोघांना सालपे तालुका फलटण भादवि कलम 302 कलमानुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
यामध्ये सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी  बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भोसले, दप्तरी मदतनीस महेश सपकाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पेरवी अधिकारी बाबुराव मदने यांनी काम पाहिले तर या पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉटचे  चे पोलीस उपनिरीक्षक श्री उद्धव दळवी, श्री सुनील सावंत ,पोलीस हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर व रहीनाबी शेख यांनी योग्य ती मदत केली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.