पुसेगाव पोलीस स्टेशन मार्फत शनिवारी ग्राम सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन: API आशिष कांबळे.

पुसेगाव पोलीस स्टेशन मार्फत शनिवारी ग्राम सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन: API आशिष कांबळे.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

 शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता यात्रा मैदान शेजारील सेवागिरी मंगल कार्यालय पुसेगाव या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळाआयोजित केलेली आहे.  
आपल्या सातारा  जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा  यंत्रणा प्रभावीरित्या कार्यान्वित करण्यासाठी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कार्यशाळा होणार आहे. 
यात्रेदरम्यान चे सूचना, आपत्कालीन परिस्थितीत द्यायच्या सूचना, चोरी दरोड्याची घटना,महिला संदर्भातील गुन्हे,लहान मुले हरवणे, वाहन चोरी,गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आगजळीताची घटना, अतिवृष्टी, महापूर, ग्रामसभा/मीटिंग बोलविने  इत्यादी घटनांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे तातडीने मदत मिळवणे व दुर्घटनांना आळा घालणे सहज शक्य होत आहे. संकटकाळात आपल्या स्वतःच्या मोबाईल फोनवरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी एकाच कॉलच्या(18002703600) माध्यमातून सूचना देणे सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी उपयुक्त यंत्रणा  ग्राम सुरक्षा यंत्रणा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम शंकर पार्वती मंगल कार्यालय पुसेगाव या ठिकाणी ठीक 10:00 वाजता होणार आहे,तरी सदर कार्यक्रमासाठी पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावामधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,पोलीस पाटील,  तलाठी, कोतवाल, तंटामुक्तीअध्यक्ष , पत्रकार बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी/ऑपरेटर,  रेशन दुकानदार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका, डॉक्टर,शिक्षक, पोस्टमन, तसेच गावातील सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, यात्रा कमिटी यांनी  सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने  उपस्थित रहावे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.