चेकचा अनादर प्रकरणी आरोपी तानाजी तुपे यास एक वर्षाची शिक्षा व दोन लाख नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश.
चेकचा अनादर प्रकरणी आरोपी तानाजी तुपे यास एक वर्षाची शिक्षा व दोन लाख नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
चेकचा अनादर केल्याप्रकरणी आरोपी तानाजी धोंडीराम तुपे यास एक वर्षाची शिक्षा व दोन लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
याबाबत हकीकत अशी की, मौजे तुपेवाडी येथील तानाजी धोंडीराम तुपे यांनी कातरखटाव येथील चंद्रकांत शिवराम बागल यांचे कडून रक्कम रुपये एक लाख उसनवार घेतले होते. सदरची रक्कम बऱ्याच वेळा मागणी केल्यानंतर आरोपी यांनी दिनांक 13 12 2012 रोजी चंद्रकांत शिवराम बागल यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कातरखटाव येथील त्यांचे खात्याचा रक्कम रुपये एक लाखाचा धनादेश दिला. सदरचा धनाजी देताना तो नक्की वाटेल याची खात्री आरोपी तुपे यांनी चंद्रकांत बागल यांना दिली होती. परंतु सदरचा एक बागल यांना 1.1.2013 रोजी बँकेत भरला परंतु तो न वाटता परत आला फिर्यादी बागल यांना त्याबाबत आरोपी तुपे यांना सदर धनादेशाबाबत 18.1.2013 ला नोटीस देऊन पंधरा दिवसात रक्कम देण्याचे कळवले परंतु तरीही आरोपी तुपे यांनी फिर्यादी बागल यांना रक्कम रुपये एक लाख दिले नाहीत, म्हणून फिर्यादी यांनी वडूज येतील ज्यु. मॅजिस्ट्रेट वर्ग नंबर एक सो यांचे कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता.सदरचा खटला 22 2 2013 रोजी दाखल केला होता त्यामध्ये फिर्यादीचा पुरावा व आरोपीचा पुरावा व दोन्ही वकिलांचा युक्तिवाद यांच्या सविस्तर अभ्यास करून फौजदारी न्यायाधीश श्री शितोळे साहेब यांनी दिनांक 6.7. 2023 रोजी आरोपीस एक वर्षाची शिक्षा व दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असा महत्वपूर्ण निकाल दिला. सदर खटल्यात फिर्यादी चंद्रकांत बागल यांचे तर्फे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट प्रकाश एच जमदाडे (बापू) ॲडव्होकेट अंकुश शिंगाडे यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment