विसापूर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यशसलग तिसऱ्या वर्षी ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

विसापूर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
सलग तिसऱ्या वर्षी ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विसापूर (ता.खटाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे. शाळेचे आर्या अमोल ढोले (२५६), अदिती बालाजी काटे (२५०), अथर्व संजय घाडगे (२२८) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. अदिती बालाजी काटे या विद्यार्थिनीने दुहेरी यश मिळवत नवोदय विद्यालयात देखील प्रवेश मिळवला आहे. सर्वाधिक गुणवत्ताधारक व सर्वाधिक निकाल कायम राखत शाळेचे आयान मुलाणी,श्रीहरी सुतार,राधिका शिंदे,वेदांत भोसले,अनुष्का साळुंखे,रिया बोभाटे,स्नेहा साळुंखे,अक्षरा सावंत,वैष्णवी शिंदे,अमेय साळुंखे,सार्थक साळुंखे,सोहम वायदंडे,आर्या साळुंखे असे एकूण १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर काटेकोर नियोजन करून विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण तयारी येथील शिक्षक करून घेतात.या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभांगी चव्हाण, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे, वैशाली नांदे, स्मिता शेळके, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे आदींचे सहकार्य लाभले.गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे,सरपंच निलम जगताप,उपसरपंच विठ्ठल साळुंखे,चेअरमन सागर साळुंखे, युवा नेते हरिश्चंद्र सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी साळुंखे,सर्व सदस्य, आजी-माजी सैनिक संघटना, सेवाभावी संस्था, विविध मंडळाचे अध्यक्ष ,महिला बचत अध्यक्ष सभासद, डॉक्टर, वकील, आजी-माजी  सैनिक संघटना ,विविध दैनिकांचे पत्रकार, संत गुंडोजीबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.