उत्तर खटाव तालुक्यातील लोकांचे जनता दरबार मध्ये ४२ विषयांचा जागेवरच निपटारा आमदार महेश शिंदे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्याच्या उत्तर विभागातील सर्वसामान्य जनतेचे महसूल खात्याशी निगडित असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसेगावच्या शंकर-पार्वती मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १३२ विषयांपैकी ४२ विषयांचा जागेवर निपटारा करण्यात आला. उर्वरित ९० विषयांवर १५ दिवसात निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.खटावचे नूतन तहसीलदार प्रशांत जाधव यांच्यासह पुसेगाव व बुध महसूल मंडलातील मंडल अधिकारी व तलाठी तसेच महसूल विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आमदार महेश शिंदे यांच्या समवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव, मिलिंद पाटिल, प्रकाश जाधव , शिवाजी शेडगे, सागर मदने, अंकुश जाधव - पाटील, सूरज जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.महसूल खात्याशी निगडीत प्रलंबित प्रश्नावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सामान्यातील सामान्य नागरिकांचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये अशा स्पष्ट सूचना आमदार महेश शिंदे यांनी तहसीलदार प्रशांत जाधव यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार प्रशांत जाधव यांनी महसूल मंडल अधिकारी यांच्याकडून प्रलंबित कामाचा आढावा घेतला. जे विषय आज मार्गी लावता आले नाहीत ते येत्या १५ दिवसात मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment