पुसेगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उपोषण करणार धीरज जाधव.

पुसेगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उपोषण करणार धीरज जाधव.

पुसेगांव प्रतिनीधी  पंकज कदम.

पुसेगाव व परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुख्य बाजारपेठ असलेले पुसेगावसह परिसरामध्ये ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून दिवस दिवस वीज पुरवठा खंडित होत आहे. हा वीज पुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी  खटाव महावितरण कार्यालयाला सातारा  जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने   जिल्हा उपाध्यक्ष धीरज  जाधव आणि  सहकारी  कार्यकरते यांनी घेराव घातला.पुसेगाव व परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून वारंवार वीज  पूरवठा  खंडित होत असून, ग्रामस्थ तसेच विविध व्यवसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा उपोषण करणार असे जाधव म्हणाले तर सातारा  भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अनेक वेळा तोंडी तक्रारी या ठिकाणी केल्या असता,  वीज पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारने सुधारणा करण्यात आली नाही, त्यास अनुसरून येथील जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पुसेगाव महावितरण कार्यालयात खंडित वीज पुरवठ्याबाबत निवेदन देण्यास गेले असता येथील अभियंता व कंत्राटी कामगार यांनी निवेदन घेण्यास नाकारले, येथील कंत्राटी कामगार यांनी उर्मट भाषा वापरून अरेरावी पणा केला. अशा अरेरावीपणा करणाऱ्या कंत्राटी कामगाराची हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केले आहे. या ठिकाणी निवेदन घेतल्या न कारणाने भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संतापाने खटाव येथील उपविभागीय कार्यालयाला घेराव घालून, या ठिकाणी अभियंत्यास निवेदन घेण्यास भाग पाडले, व येत्या काळामध्ये वीज पुरवठा खंडित न होता सुरळीत वीज द्यावी अशी मागणी करण्यात आली, तशा आशयाचे निवेदन खटाव कार्यालयाला देण्यात आले आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव, सुशांत गुंजवटे,विजय मोरे, निखिल कोकाटे, पै.राहुल जाधव, रघुनाथ घाडगे, सचिन आवळे, राहुल शिंदे, दीपक फडतरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.