एल आय सी ने विमा देशातील प्रत्येक घरा घरात पोहचवला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी.

एल आय सी ने विमा देशातील प्रत्येक घरा घरात पोहचवला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

देशाच्या जडणघडणीत एल आय सी या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे.ज्या ज्या वेळी देशाला आर्थिक गरज पडते त्यावेळी एल आय सी या संस्थेने देशाला अर्थपुरवठा केला आहे .भारतातील सर्वसामान्य लोकांचा एल आय सी वर प्रचंड विश्वास आहे.एल आय ने सर्वसामान्य लोकांना बचतीचा मंत्र दिला .त्यामुळे देशातील सर्वात जास्त घरगुती बचत एल आय सी या संस्थेत होते .बचती सोबत सर्वसामान्य व समाजातील सर्व घटकां साठी एल आय सी ने योजना आणल्या व त्याना सुरक्षित केले. आमची संघटना ही या  संस्थेतील सर्वात मोठी कर्मचारी संघटना आहे.या संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो.त्याच अनुषंगाने आम्ही निढळ येथील हनुमान विद्यालय यर्थे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते येथील विद्यार्थी वर्गाला  विविध  पुस्तकांचे वाटप करण्यात आले.असे एल आय सी संघटनेचे पदाधिकारी शरद भुजबळ यांनी सांगितले.एल आय सी ने विमा देशातील प्रत्येक घरात पोहचवला. एल आय सी ने सर्व समाज घटकांत विम्याचा प्रचार व प्रसार केला.भारतात आयुर्विमा ही संकल्पना तळागाळातील सर्वसामान्य लोकां पर्यन्त एल आय सी ने नेला .कर्मचारी संघटनेने मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करणेसाठी केलेला हा उपक्रम  अत्यंत कौतुकास्पद आहे.प्रत्येकाला विम्याची गरज आहे व तो प्रत्येक व्यक्ती ने काढावा असे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.यावेळी एल आय सी कर्मचारी संजय चव्हाण ,अमोल यादव ,प्रभाकर घोरपडे, शुभाष शिंदें,गणेश जाधव ,गिरीश जाधव,अमृत जंगम ,नरेंद्र वाघमारे, साने साहेब, रयत शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी, मुख्याध्यापक जगदीश निर्मळ ,देवगुणे जे पी, जाधवआर एस ,काटकर  ऐ एस  व विद्यार्थी व पालक उपस्थित होते .प्रास्ताविक निढळ येथील प्रसिद्ध विमा सल्लागार विलास कुलकर्णी यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.