येस ग्रुपच्या शेतकरी उपयोगी योजना चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - माजी उपसभापती नाना पुजारी.
पुसेगांव प्रतिनीधी पंकज कदम.
दयेस ग्रुपचे कार्य कौतुकास्पद असून शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा सातत्यपूर्ण यशस्वीरित्या उपक्रम राबवला असून येस ग्रुपच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे अवाहन माजी उपसभापती नाना पुजारी यांनी केले येस ग्रुपच्या जाखणगाव ता. खटाव येथील मुख्य कार्यालयात येऊन खटाव पंचायत समिती माजी उपसभापती नाना पुजारी यांनी करार शेती योजनेअंतर्गत हमीभावाचा करार केला व बियाणे वाटप प्रसंगी श्री पुजारी बोलत होते येस ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण मोफत जैविक खते व 60 टक्के अनुदानावर वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जात असून या सर्व योजना शेतकऱ्यांच्या फायद्याच्या व शेतकऱ्यांना प्रगतीकडे नेणाऱ्या आहेत येस ग्रुप हा नावलौकिक मिळवलेले कंपनी ग्रुप असून शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत पेमेंट जमा करणे व शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान देणे अशा विविध पातळीवर यशस्वीरित्या येस ग्रुप प्रगतीपथावर काम करत असून या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही श्री. पुजारी म्हणाले. चौकट- सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्यादा दर मिळावा म्हणून ही करार शेतीची संकल्पना येस ग्रुपच्या माध्यमातून राबवली जात असून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सोयाबीनला कमीत कमी 6500 रुपये व घेवड्याला 8500 रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची व्यवस्था असून यापेक्षा मार्केट रेट वाढल्यास शेतकऱ्यांना जादा दर दिला जाईल असे श्री संजय भगत यांनी स्पष्ट केले अधिक माहितीसाठी 8308790475 या नंबर वरती शेतकऱ्यांनी संपर्क करावा.
Comments
Post a Comment