महिला आर्थिक विकास महामंडळ प्रगती लोकसंचालित साधन केंद्र सातारा या केंद्राची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
दि. 28.07.2023 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा संचलित प्रगती लोकसंचलित साधन केंद्र सातारा या केंद्राची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. भाग्यश्री फरांदे मॅडम, उपायुक्त पशु विभाग मा. सावंत सर, जिल्हा समन्वय अधिकारी मा. विजय डोके सर, तालुका कृषी अधिकारी मा. धुमाळ सर, अग्रणी बँक प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र मा. योगेश पाटील सर व मा. नितिराज साबळे, पशुसंवर्धन अधिकारी मा.डॉ.विजयकुमार सावंत., पशुसंवर्धन चे सकटे सर व देशपांडे सर, सारस्वत बँक व्यवस्थापक, ICICI Bank चे लक्ष्मण चव्हाण सर उपस्थित होते. यामध्ये सुधारक पुरुष सन्मान करण्यात आला. तसेच icici bank कडुन 20 लाखाचा धनादेश रेणुकामाता महिला बचत गट मालगाव या गटाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. सरपंच महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. यावेळी फरांदे यांनी उपस्थित महिलांना महिला बचत गट, प्रक्रिया उद्योग व मार्केटिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पीक विमा योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन करून पीक विमा योजनेचा लाभ घेणेबाबत आवाहन करणेतआले. यानंतर मा.सावंत उपआयुक्त पशुसंवर्धन विभाग यांनी पशुसंवर्धन च्या सर्व योजना विषयी मार्गदर्शनकेले. जिल्हा समन्वय अधिकारी मा.विजय डोके सर यांनी महिलांना घेणारे कर्ज हे उत्पादनासाठी वापर करावा घेतलेल्या कर्जातून उद्योग व्यवसाय सुरू करावा आयुष्यात येणार्या संधी ओळखा व संधी ओळखल्या तर जे साध्य करायचे ते साध्य करता येईल. बचत गटामध्ये पंचसूत्री चा वापर केला पाहिजे त्यानंतर अग्रणी बँक प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र योगेश पाटील यांनी बँकच्या योजना सांगितल्या यावेळी उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला गटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक पल्लवी दातार यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रगती लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्व कार्यकारिणी, व्यवस्थापक, Crp व sahyogini यांनी उत्कृष्ट केले.यावेळी महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment