भौतिक शिक्षणाबरोबरच सुसंस्काराचे धडे देणाऱ्या शाळा निर्माण व्हाव्या :-आमदार महेशजी शिंदे.

भौतिक शिक्षणाबरोबरच सुसंस्काराचे धडे देणाऱ्या शाळा निर्माण व्हाव्या :-आमदार महेशजी शिंदे.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच लागू होत असून वाढत चाललेल्या या स्पर्धात्मक युगात अभ्यासक्रमाच्या तयारी बरोबरच भौतिक शिक्षणासह मुलांना सुसंस्कार देण्यासाठीही शाळांमधून जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत असे मत कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी मांडले.खटाव तालुक्यातील बुध येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन सहा खोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी लेखा व कोषागरे संचालक वैभव राजेघाटगे .बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे . , उपसरपंच . मनिषा कुंभार , माजी प्राचार्य के.डी. पवार , डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे , शिक्षण विस्तार अधिकारी  संगिता गायकवाड ., .केंदप्रमुख प्रमोद जगदाळे , माजी प्राचार्य शेखर घाटगे , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा  श्रद्धा पवार , सौ प्रिती त्रिपुटे उपस्थित होत्या .     आमदार शिंदे पुढे म्हणाले की . , 48 लक्ष रुपयांच्या निधीतून उभी राहिलेली ही शालेय इमारत आज उत्तम प्रतीचे अत्याधुनिक शैक्षणिक संकुल तयार झाले आहे. खोल्यांची रचना, प्रकाश योजना, स्वच्छता, पाणी व्यवस्था याबाबत ही इमारत विद्यार्थ्यांना अनुकूल ठरणार असून बुध गावचा प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी हे आदर्श शैक्षणिक संकुल सज्ज झाले असल्याची भावना आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. या इमारतीच्या उभारणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सरपंच अभयसिंह राजेघाटगे व मुख्याध्यापिका मीना फडतरे व इतर सर्व सदस्य तसेच शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे नमूद करून सर्वांचेच अभिनंदन आमदार शिंदे यांनी केले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले महाराष्ट्र मंत्रालयातील लेखा व कोषागरे विभागाचे संचालक वैभवराजे घाटगे म्हणाले की, शाळेला दीडशे वर्षांची मोठी परंपरा असून या शाळेने आजवर अनेक यशवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध मार्गांनी अत्याधुनिक डिजिटल साधने उपलब्ध करून देण्यात येत असून, संगणकीय शिक्षण, स्पर्धा परीक्षा, अध्ययन निष्पत्ती यामध्ये शाळेचा आलेख नेहमी चढता ठेवण्यासाठी व मुलांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थ यांनी एकत्र राहून काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.सरपंच अभयसिंह राजेघाटगे  यांनी आपल्या प्रास्ताविकातून जुन्या खोल्यांचे निर्लेखन, नवीन इमारतीसाठी निधीची उपलब्धता,  कामाचा दर्जा याबाबत संपूर्ण माहिती दिली. तसेच पुढील काळात शाळेच्या विविध सुधारणाबाबतचे विश्लेषण त्यांनी केले.
 उद्घाटनाच्या औचित्याने  यावेळी कोल्हापूर येथील बियाणी टेक्नॉलॉजी यांचेमार्फत शाळेसाठी जवळपास दोन लक्ष रुपयांचे इंग्रजी भाषा समृद्धी सॉफ्टवेअर प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी सढळ हाताने . देणगी . देणाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .या उद्घाटन प्रसंगी उपअभियंता . संजय खोत , अभय जगदाळे , प्रिया साळुंखे , भाग्यश्री बागवडे , दयानंद जगदाळे , किरण खवळे , सुनिल गायकवाड , शरद सातपुते , राजेंद्र देसाई , दत्तात्रय खवळे , मधुकर क्षिरसागर . , कल्याणी . मेडिकल फाऊंडशनचे खांडेकर सर . , सुभाष बोराटे , संजय देसाई , रामदास मेळावणे , अनिल जाधव , हणमंत घनवट , दशरथ घनवट ,, एकनाथ जगदाळे , राहुल जगदाळे , मधुकर जगदाळे , शिवाजी देसाई , शशिकांत पोतदार . , गजानन जगदाळे ,विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन . अजित चव्हाण यांनी केले . तर आभार .पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.